राजर्षी शाहू कॉलेज ऑफ फार्मसी बुलढाणा यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन* दि. १०/०३/२०२२ रोजी पार पडले. या वेळी कार्यक्रमचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष जैन हे उपस्थित होते. तसेच या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून दत्तक ग्राम साखळी बुद्रुक च्या सरपंच सौ. सूनिताताई भास्करराव भगत , ग्राम पंचायत सदस्य सौ. बोराडे ताई, श्रीमती पार्वताबाई उगले, पोलिस पाटील श्री संदीपभाऊ सपकाळ, माजी मुख्याध्यापक श्री. जुमडे सर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रकाश केंद्रे , आर्ट ऑफ लिव्हिंग चे श्री. गोपाळ वेरूळकर सर तसेच ग्रामस्थ यांची उपस्थिती होती. या वेळी श्री जुमडे सर यांनी स्वयंसेवकांना शिक्षणासोबत समाज सेवा जोपासण्याची सूचना केली. तसेच आर्ट ऑफ लिव्हिंग चे वेरूलकर सर यांनी युवकानं मध्ये नेतृत्व गुण वाढण्यासाठी भर दिला पाहिजे तसेच सर्वागीण विकासासाठी कटीबद्ध असले पाहिजे असं सांगितले. या वेळी कार्यक्रमचे अध्यक्ष मा. डॉ. शिरीष जैन सर यांनी सर्व शिबिरार्थिना होणाऱ्या शिबिरा मध्ये दत्तक ग्राम येथे राहून त्या लोकांच्या गरजा समजून त्यांना आपल्या महाविद्यालया तर्फे समाज जीवन मध्ये मदत होईल असे उपक्रम राबवण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच उप प्राचार्य डॉ. केंद्रे सर यांनी स्वयंसेवकांना सूचना दिल्या. यावेळी प्रस्थावना कार्यक्रम अधिकारी श्री रोहित सालकुते यांनी वाचली. सुत्रसंचलन कू. भावना ढोरे हिने केले तर आभार प्रदर्शन धिरेंद्र तिवारी याने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सह अधिकारी श्री मंगेश देवकर,प्रा. शीतल रेदसानी, प्रा. आरती काळे , सर्व स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले. दत्तक ग्राम : साखळी बक, बुलढाणा