राजर्षी शाहू कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आज दत्तकग्राम साखळी बु. येथे मतदार जनजागृती मोहीम राबवण्यात आली. या मध्ये नवीन मतदारांना नोंदणी करण्यासाठी ग्रामपंचयतीसहाय्याने फॉर्म वाटप करण्यात आले व आवश्यक कागतपत्रांसंबंधी मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच मतदानाचे महत्व विषद करण्याकरिता गावातून फेरी काढण्यात आली. या मतदार नोंदणी शिबिरात नवीन १२३ मतदारांना फॉर्म वाटप करून , माहिती भरून घेण्यात आली.
कार्यक्रमाचा शेवटी सरपंच महोदया सौ. भगत यांच्या मार्गदर्शनात येत्या रासेयो शिबिरासाठी दत्तकग्राम येथे आवश्यक असल्यालेल्या कामांची माहिती घेण्यात आली.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राचार्य डॉ शिरीष जैन यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम अधिकारी श्री. रोहित सालकुटे , सहकारी श्री. अमोल रावे, श्री. दिपक यांकळकर तसेच रासेयोच्या सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.