राजर्षी शाहू कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. या निमित्त प्राचार्य डॉ. शिरीष जैन यांच्या संकल्पनेतून महिला विद्यार्थिनी साठी आरोग्यवर्धक पोषण आहार अंगिकारण्यासाठी बुलढाणा येथील आहारतज्ञ डॉ. साधना भवटे यांना निमंत्रित केले होते. डॉ साधना भवटे यांनी विद्यार्थीनीच्या दैनंदिन आहारामध्ये आवश्यक घटकांच्या साठी मार्गदर्शन केले तसेच उपस्थितांच्या प्रश्नाचे निराकरण केले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष जैन , रासेयो चे डॉ. विजय बोरकर , प्रा. मंगेश देवकर कार्यक्रम अधिकारी प्रा. रोहित सालकुटे, प्रा. निशा गदिया, प्रा. भाग्यश्री बुधवत यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कू. मृणाल मुंढे यांनी केलं तर आभाप्रदर्शन कू. वैष्णवी कायंदे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व रासेयो स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.