राजर्षी शाहू कॉलेज ऑफ फार्मसी बुलढाणा च्या राष्ट्रिय सेवा योजनेच्या श्रम संस्कार शिबिरामध्ये वतीने दत्तक ग्राम साखळी येथे मोफत हिमोग्लोबिन तपासणी व आहार मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. गावकऱ्यांना एक्सपायरी मेडीसिन चे व्यवस्थापन कसे करावे याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. शैलेश केवतकर यांचे गावकऱ्यांना समजेल अश्या सोप्या भाषेत मार्गदर्शन शिबीर . गोळ्या आणि एक्सपायरी असलेल्या बॉटल तेव्हा माती , पाणी च्या माध्यमातून अन्नावाटे आपल्या शरीरात परत येऊन विविध प्रकार च्या दुर्धर आजाराला आमंत्रण देतात. या विषय सखोल मार्गदर्शन करण्यात आले. आणि त्यासाठी काय उपाययोजना आपण गावामध्ये राबवू शकतो याविषय स्वयमसेवकांना सूचना करण्यात आल्या. यावली सर्व ग्रामस्थांना पथकाच्या वतीने आयुर्वेदिक काढाचे वाटप करण्यात आले तसेच. चहा ऐवजी या काध्याचे आपल्या जीवन शैली मध्ये स्थान वाढवून निरोगी राहण्यासाठी कसा फायदा होतो या विषयी महिलांना स्वयंसेवकांनी विनंती केली. साखळी च्या सरपंच यांनी या वेगळ्या मुद्द्यावर दिलेल्या मार्गदर्शन बद्दल समाधान मानून धन्यवाद मानले आणि यापुढे आम्ही या विषयी जागरूकता ठेवून औषधी व्यवस्थापन करू अशी सर्व ग्रामस्थांनी ग्वाही दिली.