आज राजर्षी शाहू कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात, राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने संविधान दीन साजरा करण्यात आला. या प्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच संविधान दिन शपथ घेऊन संविधान पालन करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे प्रतिपादन करण्यात आले. या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी जैन यांच्या मार्गदर्शनात, उपप्राचार्य डॉ. केंद्रे, विभाग प्रमुख डॉ हरलालका, डॉ. बोरकर, डॉ केवतकर, तसेच डॉ. देशमाने, श्री विभुते, श्री हुरपडे , डॉ संचेती , श्री. शेळके , तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री योगेश जोशी यांनी केले तसेच कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयमसेवकांनी परिश्रम घेतले.