राजर्षी शाहू कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महापिनिर्वाण दिना निमित्य अभिवादन करण्यात आले.
या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिरीष जैन यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. या प्रसंगी डॉ.केंद्रे, डॉ बोरकर, डॉ हरलालका, डॉ. केवतकर, डॉ. देशमाने, डॉ. संचेती, श्री. विभुते, श्री. तायडे , श्री. हुरपडे, डॉ. लोकवानी , श्री देवरे, श्री देवकर, रासेयो कार्यक्रम अधिकारी श्री रोहित सालकुटे तसेच इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
या प्रसंगी प्राचार्य डॉ शिरीष जैन यांनी महामानव डॉ. बाबा साहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन सर्व उपस्थितांना केले. या प्रसंगी रासेयो स्वयंसेवक जगदीश गीते यांनी सूत्रसंचलन केले व योगेश जारे याने उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.