महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार महाविद्यालयीन विद्याथ्यांचे लसीकरण पूर्ण करून महाविद्यालये सुरु करण्याचा अनुषंगाने राजर्षी शाहू कॉलेज ऑफ फार्मसीच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने “ मिशन युवा स्वास्थ कोविड लसीकरण मोहीम ” अंतर्गत महाविद्यालयाच्या परिसरात लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र वरवंड उपकेंद्र भादोल्याची वैद्यकीय चमू ज्यामध्ये डॉ.गणेश गरकळ, आरोग्य सेवक झिने काका, आरोग्य सेविका मोरे सिस्टर व तसेच आशा वर्कर्स यांची उपस्थिती होती. या लसीकरण शिबिरामध्ये १३० जणांनी कोविशिल्ड तसेच कोवॅक्सिन लसीचा लाभ घेतला. यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा समावेश होता. या लसीकरण शिबिराच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.पी.जैन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.डॉ.विजय बोरकर, प्रा.परमेश्वर देवरे, प्रा.दिपक भुसारी, तसेच रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.रोहित सालकुटे व रासेयोंच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.