आज राजर्षी शाहू कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आजच्या दिवशी सर्वप्रथम महिला सबलीकरण या विषयावर रांगोळी स्पर्धा तसेच वॉलस्पेस (चित्रकला/पोस्टर मेकिंग) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थिनी यांनी विविध प्रकारच्या सुंदर रांगोळी रेखाटल्या व त्याद्वारे महिलांचे आजच्या युगातील स्थान अधोरेखित केले. या दोन स्पर्धा झाल्या नंतर एका आगळ्यावेगळया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ज्या मध्ये आजच्या युगातील महिलांसाठी रोल मॉडेल असणाऱ्या वेशभूषेत येऊन विद्यार्थ्यांनी त्यांचा समाजासाठी असणार अनन्य साधारण महत्व पटवून दिले. आजच्या स्त्रीला किती वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवता येतो हे या स्पर्धेमधून हे सर्वांसमोर मांडता आले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. केवतकर, डॉ. लोकवानी व तसेच प्रा. शीतल रेदासानि यांनी काम पाहिले. या स्पर्धेत कु. अदिती चंदनकर (प्रथम), कु. अचाल वानखेडे (व्दितीय) व कु. हर्षदा काळे (तृतीय) यांनी क्रमांक पटकावला. या नंतर राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने सर्व महिला शिक्षिका व तसेच विद्यार्थिनींचे मोफत हिमोग्लोबिन व रक्तगट तपासणी करण्यात आली. या मध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून काम पाहिले. या नंतर महिलांची किशोरवयीन अवस्था व आरोग्य या विषयावर सर्व महिला शिक्षिका व विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. अश्विनी जाधव (प्रसिद्ध डायबेटीओलोजिस्त) बुलढाणा यांचे तज्ञ मार्गदर्शन लाभले. या वेळी प्रा. शीतल रेदासानी , प्रा. भालके, प्रा. भाग्यश्री बुधवत , प्रा. आरती काळे, प्रा. निशा गादिया , प्रा. दळवी यांच्या उपस्थितीत हे तज्ञ मार्गदर्शन झाले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी सर्व महिला शिक्षिका यांचा तसेच प्रमूख पाहुण्यांचा सत्कार केला. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन कू. प्राची चोपडे व कू. आकांशा कुलकर्णी यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन रासेयो कार्यक्रम अधिकारी रोहीत सालकुटे यांनी मानले. आज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष जैन यांच्या संकल्पनेतून महिला दीन फक्त एक औपचारिक कार्यक्रम न घेता खरोखर महिलांचे समाज जीवनातील महत्व विषद करणारे ठरावा यासाठी या विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. शीतल रेदासनी(रासेयो महिला कार्यक्रम अधिकारी), डॉ. केंद्रे, डॉ बोरकर, प्रा. विक्रम संचेती, प्रा. मंगेश देवकर, प्रा. सोनार , प्रा. रोहीत सालकुटे (रासेयो कार्यक्रम अधिकारी), सर्व महिला शिक्षिका, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी मदत केली. तसेच महाविद्यालयाच्या सर्वच विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.