राजर्षी शाहू कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आज एड्स जनजागृती पर मार्गदर्शन तसेच एड्स तपासणी शिबीर आयोजित केले होते.या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रमोद ताले(प्रकल्प अधिकारी, एड्स जनजागृती मिशन, जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलढाणा) यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना या रोगाची विविध संकल्पना अत्यंत सोप्या भाषेत विषद केल्या. तसेच मिळालेली माहिती जनसामान्यात जावून पोहोचवावे असे त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले. या नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. शिरीष जैन यांनी सामाजा मधे या रोगा बद्दल ची वाढलेली विषमता , रोग्यांबद्दल असलेला दृष्टिकोन बदलण्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध मार्गाने प्रबोधन करावे असे सुचित केले. तसेच दत्तक ग्राम साखळी बुं. येथे होणाऱ्या रासेयोच्या हिवाळी शिबिरामध्ये एड्स विषयी तसेच एड्स रोगी विषयी सर्व संभ्रम दूर करण्यासाठी आवश्यक कार्यरचना करावी असे सुचित केले.या नंतर सर्व प्राध्याकांनी तसेच विद्यार्थ्यांनी स्वतःची HIV टेस्ट केली. या साठी जिल्हा सामान्य रुग्णालयातून श्री. भीमराव सवांग( समुपदेशक) , श्री. भारत कोले ( समुपदेशक) व कु. इंदू मोरे ( समुपदेशक) यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव चिपडे तसेच आभार प्रदर्शन कु. प्राची चोपडे यांनी केले. या प्रसंगी सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राचार्य डॉ शिरीष जैन यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम अधिकारी श्री. रोहित सालकुटे , महिला कार्यक्रम अधिकारी सौ. शीतल रेदासानी, डॉ. विजय बोरकर श्री. मंगेश देवकर,श्री. परमेश्वर देव्हरे श्री. दिपक भुसारी, तसेच रासेयोच्या सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.