राजर्षी शाहू कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रम संस्कार शिबिराची सांगता दि. १६/०३/२०२२ रोजी डॉ. प्रफुल्ल गवई सर (सिनेट सदस्य, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ) यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या वेळी दत्तक ग्राम साखळी च्या सरपंच सुनिताताई भगत, पोलिस पाटील संदीप भाऊ सपकाळ, उपसरपंच गजानन लवंगे , महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ प्रकाश केंद्रे, इतर ग्राम सदस्य यांच्या उपस्थितीत झाली. या वेळी रासेयो कार्यक्रम अधिकारी रोहित सालकुटे यांनी शिबिर दरम्यान श्रमदानातून झालेल्या कामांची माहिती प्रमुख पाहुण्यांना दिली. ज्यामध्ये डॉ शिरीष जैन (प्राचार्य) यांच्या मार्गदर्शनात महिलांसाठी मोफत हिमोग्लोबिन तपासणी तसेच आहार मार्गदर्शन शिबिर, वैधता संपलेल्या औषधांचे व्यवस्थापन, साखळी बुद्रुक येथील स्मशान भूमी मध्ये वाटिका सवर्धन आणि कंपोस्ट खत व्यवस्थापन या विविध ग्राम उपयोगी कामांचे स्वयंसेवकांनी श्रमदानाने केलेल्या वाचन केले. तसेच या शिबिरसाठी ग्रामस्थांनी केलेल्या मदती साठी धन्यवाद मानले. यात प्रामुख्याने सूनिताताई भगत, संदिपभाऊ सपकाळ, नानाभाऊ लाहासे, व इतरांनी केलेल्या निस्वार्थ मदतीचे महत्त्व नमूद केले. या वेळी शिबिरात सहभागी स्वयंसेवकांमधून उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून कु. भारती डांगे व चि. प्रथमेश गुजर यांची निवड करण्यात आली. तसेच उत्कृष्ठ चमू म्हणून जंजिरा ग्रुपच्या स्वयंसेवक चमुची निवड करण्यात आली. या वेळी प्रमुख पाहुणे डॉ. गवई सर यांनी त्यांच्या वकृत्वशैलीमध्ये उपस्थित मान्यवर, गावकरी तसेच विद्यार्थ्यांचे मन जिंकले आणि सर्वांना उपयोगी त्रिसुत्री आचरणात आणण्याचे आवाहन केले. उपप्राचार्य डॉ. केंद्रे यांनी रासेयोच्या शिबीराचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल अभिनंदन केले. तसेच पोलिस पाटील यांनी गावाच्या वतीने आयोजित सर्व उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी संचालन कु किरण मापारी हिने केले तर आभार प्रदर्शन पंकज जायभाये यांनी केले. शिबीराच्या यशस्वीतेसाठी शीतल रेदासानी(महिला कार्यक्रम अधिकारी), प्रा. मंगेश देवकर, प्रा.अमोल घोडके, प्रा. आरती काळे, प्रा. सद्दाम चांद, प्रा. निशा गादिया, प्रा. मेघा दळवी, प्रा. भाग्यश्री बुधवत तसेच आर्ट ऑफ लिव्हिंग चे शिक्षक गोपाळ वेरुळकर, सर्व रासेयो स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.