राजर्षी शाहू कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिरामध्ये संत गाडगे बाबा अमरावती विद्यपीठाच्या रासेयो समन्वयक डॉ. राजेश बुरंगे सर, शिक्षक मंचाचे अध्यक्ष डॉ. प्रदिप खेडकर सर, प्रा. डॉ. मनोज व्यवहारे सर, प्रा. विलास ताले सर यांची सदिच्छा भेट. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ प्रकाश केंद्रे, गावाच्या सरपंच सौ सूनीताताई भगत, रासेयो कार्यक्रम अधिकारी श्री. रोहीत सालकुते, पोलिस पाटील संदीप भाऊ सपकाळ, प्रा. सोमनाथ विभुते ,नानाभाऊ लहासे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी डॉ. बुंरगे सर यांनी स्वयंसेवकांना रासेयोच्या माध्यमातून गावाच्या विकासात हातभार लावून देशसेवेसाठी कटीबद्ध असावे असे सुचित केले. तसेच डॉ. प्रदीपजी खेडकर सर यांनी विध्यार्थी जीवनात रासेयो चे महत्व विषद करून सर्वांनी या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन सर्वांगीण विकास करून सेवेरुपी स्वभाव अंगिकारावा असे प्रतिपादन केले. साखळी बु. च्या सरपंच सौ सुनीता भगत ताई यांनी सर्वांचे गावात स्वागत करून त्यांचे शिबीर आयोजन केल्यामुळे आभार मानले. तसेच सर्व प्रकारे शिबिरार्थिंना सहकार्य करण्याचे वचन दिले. या छोटेखानी कार्यक्रमाचे सूत्रसंचान कू. रूचा खांदे हिने केले तर आभार प्रदर्शन गौरव मिरगे यांनी केले. या प्रसंगी सर्व सह कार्यक्रम अधिकारी, स्वयंसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते.