बुलडाणा :द्वारका बहुउदेशीय ग्रामीण विकास फाऊंडेशन चे अध्यक्ष मा. आ. धृपदराव सावळे यांच्या ६७ व्या वाढदिवसानिमित्त राजर्षी शाहू फार्मसी महाविद्यालयामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस पी जैन यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आले.कार्यक्रमाचे उदघाटन महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा डॉ प्रकाश केंद्रे व डॉ शीतल सोळंके, रक्तपेढी अधिकारी यांनी केले. शासकीय रक्तपेढी पथक बुलडाणा यांच्या वतीने डॉ शीतल सोळंके, रक्तपेढी अधिकारी, श्री गौरव कुलकर्णी रक्तपेढी तंत्रज्ञ,सीमा मेश्राम,भूषण खरे,कैलास गायकवाड,ज्ञानेश्वर गाडेकर, अनिल घोडस्वार, यांनी रक्त संकलन केले. डॉ शीतल सोळंके यांनी रक्तदानामुळे होणारे फायदे कोणाचा जीव वाचविण्यासाठी रक्तदान किती महत्वाचे आहे तसेच रक्तदानाचे महत्व विशद केले. यावेळी सदर चमूचे महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे रजिस्ट्रार श्री. योगेश जोशी सर यांनी केले त्यात त्यांनी श्री धृपदरावजी सावळे साहेब यांचा सम्पूर्ण राजकीय, सामाजिक व कौटुंबिक जीवनपट प्रास्ताविकाद्वारे उपस्थितासमोर दिला व आभार प्रदर्शन प्रा डॉ गौरव हरलालका यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ प्रकाश केंद्रे, प्रा. डॉ बोरकर, प्रा डॉ केवतकर, प्रा.शरद तायडे, प्रा डॉ. सुभाष देशमाने प्रा डॉ विक्रम संचेती,प्रा.सतीश शेळके, प्रा.संदीप हुरपडे,प्रा. सोमनाथ विभुते,प्रा डिवरे,प्रा बोरीकर,प्रा डॉ लोकवाणी, प्रा डॉ सोनार,प्रा भालके,प्रा. काळे, प्रा घोडके तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे विद्यार्थी व कर्मचारी वृंद यांनी मिळून श्री धृपदरावजी सावळे साहेब यांच्या ६७ वा वाढदिवसानिमित्त ६७ रक्तदात्यांचे रक्तसंकलन केले प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांनी रक्तदान केले. याकार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या फार्माकॉलॉजी विभागाने परिश्रम घेतले.