राजर्षी शाहू फार्मसी महाविद्यालयामध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली . यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.मीना भालके या होत्या तर प्रमुख मार्गदर्शक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस पी जैन हे होते .सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . यावेळी प्राचार्य डॉ.एस पी जैन यांनी आजच्या सावित्रीबाई फुले यांचे कार्य व त्यांनी घालुन दिलेली जीवनतत्वे आपण जपली पाहिजेत हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल असे सांगितले. महाविद्यालयामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमिता महिला प्राध्यापक मीना भालके यांचे एक दिवससाठी प्राचार्य पदी नेमणूक करण्यात आली व सर्व महिला प्राध्यापक व महिला कर्मचारी, व विध्यार्थिनी यांचा गौरव करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा.डॉ.हरलालका यांनी केली यावेळी भाग्यश्री बुधवत, प्रा.देव्हरे, प्रा.देवकर ,प्रा.डॉ.प्रकाश केंद्रे व प्रा मीना भालके यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सतीश शेळके यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा रोहित सालकुटे यांनी केले.यावेळी प्रा. अश्विनी नवघरे.प्रा.पूजा कोचर प्रा. डॉ. बोरकर,प्रा हुरपडे, रासेयो अधिकारी प्रा.देवकर, प्रा.विभूते ,प्रा डॉ संचेती, ,प्रा डॉ तेलंगे,प्रा चाकोलकर, प्रा .भुसारी ,प्रा.डॉ.सोनावणे, प्रा.डीवरे,पांडुरंग भोसले, गणेश काळे , अमोल रावे,शिवम रिंढे सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.सदर कार्यक्रम महाविद्यालायच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकयांच्या वतीने आयोजित करण्यात आला.