२३ जानेवारी “पराक्रम दिनी” महाविद्यालयामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती रासेयो अंतर्गत साजरी करण्यात आली. यावेळी सुभाषबाबूंच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले , त्यानंतर कार्यक्रमाची प्रस्तावना रासेयो अधिकारी देवकर यांनी केली , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष जैन यांनी नेताजींच्या स्वातंत्र्य लढ्यातील जागतिक पातळीवरील अमूल्य योगदान आणि कार्य यावर प्रकाश टाकला . कार्यक्रात उपस्तित डॉ. विजय बोरकर , डॉ. गौरव हरलालका, प्रा. सोमनाथ विभुते , महेश मोले यांनी सुद्धा आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. अश्विनी नवघरे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन प्रा. रोहित सालकुटे यांनी केले. सादर कार्यक्रम रा. से. योजने अंतर्गत घेण्यात आला.