स्थानिक -राजर्षी शाहू कॉलेजऑफ फार्मसी महाविद्यालामध्ये भारतरत्न डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या ८९ व्या जयंतीच्या निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम सम्पन्न करण्यात आला सदर दिवस हा वाचन प्रेरणा दिवस, कौशल्य दिवस व जागतिक विद्यार्थी दिवस म्हणूनही साजरा केल्या जातो अभिवादन प्रसंगी महाविद्यालयाचे फार्मासुटिकस विभागाचे विभाग प्रमुख डॉ प्रकाश केंद्रे सर यांच्या हस्ते डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. डॉ ए. पी. जे. डॉ अब्दुल कलाम हे भारताचे पूर्व राष्ट्रपती तसेच पदमश्री पदमविभूषण यासारख्या अनेक गौरवाने परिपूर्ण असे व्यक्तिमत्व असून राष्ट्रसुरीक्षितच्या दृष्टिकोनातून त्यांनी एस एल व्ही प्रेक्षेपण तसेच भारताची मिसाईल ताकद भरीव करण्याच्या दृष्टिकोनातून केलेले कार्य हे नेहमी स्मरणात राहील असे मनोगत डॉ प्रकाश केंद्रे सर यांनी व्यक्त केले. याप्रसंगी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्या मार्फत INNOVATION & Dr Abdul Kalam हे विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्राचा लाभ महाविद्यालयीन शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांनी ऑनलाईन पद्धतीने घेतला कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री योगेश जोशी यांनी केले. तसेच महाविद्यालयातील इतर प्राध्यापकांनी सुद्धा याठिकाणी त्यांचे मनोगत प्रगत केले तसेच डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवन चरित्रावर आधारित पुस्तकांचे विमोचन व वाचन याप्रसंगी करण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना पथक प्रमुख श्री वाय बी उबरहंडे सर, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.