राजर्षी शाहू कॉलेज ऑफ फार्मसी बुलढाणा एनएसएस युनिटच्या वतीने बुलढाण्यात विविध ठिकाणी “एकदाच वापरात येणार प्लास्टिक कचरा टाळा” ( सिंगल यूज्ड प्लास्टिक ) या विषयावर रोड शो आयोजित केला होता.
या कार्यक्रम रासेयो च्या वतीने बुलढाण्यात सुंदरखेड स्टॉप , कारंजा चौक , बस स्टॅन्ड परिसर येथे जाऊन जनजागृती आणि परिसर स्वच्छता करण्यात आली. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. जैन यांच्या मार्गदर्शनात डॉ.विजय बोरकर, श्री. परमेश्वर देव्हारे , रासेयो कार्यक्रम अधिकारी श्री. रोहित सालकुटे आणि स्वयंसेवक उपस्तित होते.या पथनाट्यमध्ये रोहित पवार या स्वयंसेवकाने संत गाडगे बाबा यांची वेषभूषा साकारून या ज्वलंत विषयावर प्रकाश टाकला कि एकदाच वापरात येणार प्लास्टिक कचरा टाळण्याची खरोखर गरज आहे.